ताज्याघडामोडी

रस्ते सुरक्षा ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग- महेश रायबान

पंढरपूर सिंहगड मध्ये “रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त” मार्गदर्शन

मोटार वाहन अपघातास परीणामकारकरित्या आळा बसावा व नागरीकांमध्ये रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरीता पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये रस्ता वाहतूक सप्ताह निमित्त मार्गदर्शन करणार आले.
यावेळी सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील महेश रायबान बोलताना म्हणाले, वाहतुक नियमांचे काटेकोर पालन करणे, अपघातास आळा घालणे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत करणे, पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना आपले वाहन चालविण्याकरीता ताब्यात देवू नये. रस्ते सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाचे असून रस्ते संदर्भातील कायदे व नियमाचे तंतोतत पालन होणे आवश्यक आहे. रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक असते, त्यातही डोक्याला मार लागुन होणाऱ्या मृत्युंची संख्या जास्त असते. त्यामुळे हेल्मेटचा वापर हा अत्यंत आवश्यक आहे. अशाप्रकारे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा ही स्वयंप्रेरणेने पाळावयाची बाब आहे रस्ते सुरक्षा ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असल्यचे मत उपप्रादेशिक परिवहन विभागाचे महेश रायबान यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये बोलताना व्यक्त केले.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर व रोटरी क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्याकडून ३४ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२३ चे आयोजन पंढरपूर सिंहगड मध्ये करण्यात आले होते. यादरम्यान प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश रायबान, मयुर जाधव,
आधिका खरात यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार महाविद्यालयाकडून करण्यात आला.
यावेळी परिवहन विभागाच्या आधिका खरात व मयुर जाधव यांनी उपस्थितांना स्क्रीन द्वारे व्हिडीओ दाखवून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा देण्यात आली. उपस्थितांना वाहतूक नियमावलीत बाबतचे पञक वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी मानले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago