हरयाणाच्या पलवलमध्ये एका डिलिव्हरी बॉयची गोळी झाडून हत्या करण्यात आली. घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ माजली. पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. काही तासांमध्येच आरोपींना अटक करण्यात आली.
पोलिसांनी हत्या प्रकरणाचा काही तासांमध्येच उलगडा केला. तपासातून धक्कादायक सत्य उघडकीस आलं. डिलिव्हरी बॉयची हत्या त्याच्याच पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केली होती. दोघांच्या विवाहबाह्य संबंधात पती अडथळा ठरत होता. त्यामुळे त्यांनी त्याचा काटा काढला.
संजय गौतम असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. संजयच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात हत्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. संजयचे वडील रामदास गौतम मथुराचे रहिवासी असून ते सिंचन विभागात कार्यरत आहेत. अलीगढ जिल्ह्यातील खैरगावात ते सेवा बजावत होते. त्यानंतर पलवलमध्ये त्यांची बदली झाली. तेव्हापासून रामदास गौतम मुलांसह पलवलच्या कानुनगो मोहल्ल्यात वास्तव्यास होते.
रामदास गौतम यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे. सर्व मुलं विवाहित आहेत. त्यांचा सर्वात धाकटा मुलगा संजय गौतम उर्फ गुड्डू एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास तो घरातून कामासाठी निघाला. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास पलवलच्या हुड्डा सेक्टर १२ मध्ये संजय मृतावस्थेत आढळून आला. अज्ञात व्यक्तीनं गोळी झाडून त्याची हत्या केली होती.
पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. संजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. संजय फूड डिलिव्हरी कंपनीत काम करायचा. पोलिसांनी संजयची पत्नी, त्याचं कुटुंब आणि सहकाऱ्यांकडे चौकशी केली. पोलिसांना पत्नीवर संशय आला. तिची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत तिनं सत्य सांगितलं. शेजारी राहणाऱ्या गोपाळसोबत प्रेमसंबंध असल्यानं, त्यात पती अडथळा ठरत असल्यानं संजयची हत्या केल्याची कबुली तिनं दिली.
आरोपी पत्नी पारुलनं संजयला कॉल करून संजयला त्याचा ठावठिकाणा वितारला. त्याच्या लोकेशनची माहिती गोपाळला दिली. त्यावेळी संजय काम आटोपून घरी परतत होता. गोपाळ त्यानं गाठलं आणि लिफ्ट मागितली. संजय जिमखाना क्लबपर्यंत लिफ्ट देण्यास तयार झाला. बाईक क्लबजवळ पोहोचताच गोपाळनं संजयची गोळी झाडून हत्या केली. पारुलनं गुन्हा कबूल केल्यानंतर गोपाललादेखील अटक करण्यात आली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…