शिराळा येथून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका मातेने आपला जीव गमावला आहे. शिराळा येथील तडवळे येथे घरासमोर उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरुन घसरुन रस्त्यावर खेळत असलेल्या दोन मुलांच्या अंगावर जात होता. मात्र, तेवढ्यात त्यांची आई त्यांना वाचवण्यासाठी धावून आली. मात्र, मुलांना वाचवण्यासाठी धावताना या आईचा पाय घसरला आणि ट्रक्टरला जोडलेला नांगराचा फाळ थेट तिच्या डोक्यात घुसला. त्यानंतर उपचारादरम्यान या आईचा मृत्यू झाला.
मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात आईचा मृत्यू
मुलांना वाचवताना या आईने जीव गमावल्याने दोन मुलं पोरकी झाली आहेत. संचिता संपत पाटील (वय २८) असं या आईचं नाव आहे. तडवळे येथे पाटील कुटुंब राहतं. संपत पाटील यांनी त्यांच्या मालकीचा ट्रॅक्टर रोजप्रमाणे घरासमोर रस्त्याच्या कडेला उभा केला होता. दुपारच्या सुमारास संचिता या अंगणातील गोठा स्वच्छ करत होत्या आणि त्यांची दोन्ही मुलं कृषांत (वय २) आणि दुर्वा (वय ४) ही रस्त्यावर खेळत होती.
रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर उभा होता
यादरम्यान, रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रॅक्टर अचानक सरकला आणि तो रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांच्या दिशेने जाऊ लागला. हे लक्षात येताच संचिता यांनी आरडाओरड केली आणि थेट त्या मुलांना वाचवण्यासाठी धावल्या. मात्र, यावेळी अचानक धावताना त्यांचा पाय घसरला आणि त्या ट्रॅक्टरच्या मागे जोडलेल्या नांगराच्या फाळावर जाऊन पडल्या.
नांगराचा फाळा आईच्या डोक्यात घुसला
यामध्ये नांगराचा फाळा त्यांच्या डोक्यात घुसला. त्यानंतर तो ट्रॅक्टर थांबला पण संचिता या गंभीर जखमी झाल्या. जेव्हा संचिता या आरडाओरड करत धावल्या तेव्हा त्यांचे शेजारी देखील धावले आणि त्यांनी मुलांना रस्त्यातून बाजूला केलं. त्यानंतर संचिता यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…