ताज्याघडामोडी

दोन मुलांच्या बापाचे चार मुलांच्या आईशी प्रेमसंबंध, प्रेमासाठी केली आत्महत्या

एका अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आहे. दोन मुलांचा बाप आणि चार मुलांच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राजस्थानच्या बाडमेर येथे घडली आहे.

बाडमेर जिल्ह्यातील आवटी गावातील ही घटना आहे. गावातील माधाराम याचे चार मुलांच्या आई असलेल्या मगीसोबत अवैध संबध होते. त्याबाबत माधारामच्या पत्नीला कळले होते. त्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. माधाराम यांचा मुलगा अनोपाराम याला दोन मुलं आहेत. त्याचे अवैध संबध असल्याने त्याची पत्नी आणि त्याच्यात सतत वाद व्हायचे. त्यामुळे बायको कंटाळून मुलांना घेऊन माहेरी गेली. दोन दिवसांपूर्वी दोघंही अचानक गायब झाले. महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात बायको मगी बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. आता माधाराम आणि मगी दोघांचे मृतदेह घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत सापडले.

माधाराम आणि मगी यांची एका लग्नात ओळख झाली होती. दोघांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली होती. त्यामुळे दोघांच्या कुटुंबात दरदिवशी भांडणे व्हायची. मगीच्या घरात त्यावरुन जोरदार भांडण झाल्याने ती घर सोडून माधारामच्या घरी आली होती. जिथे माधारामच्या घरात एकाच फाशीत दोघांनी आत्महत्या केली. माधाराम आणि मगीचा काहीच पत्ता लागत नव्हता. दोघं एकत्र पळाल्याच्या अफवा होत्या, अशात माधारामच्या कुटुंबियांनी त्यांना सगळीकडे शोधले. पण जेव्हा माधारामच्या घरी सगळे पोहोचले दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर आसपासच्या लोकांना आणि पोलिसांना त्याची माहिती दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago