बजाज फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या पर्सनल लोनचा एक हप्ता थकला. त्याच्या वसुलीसाठी घरी गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवले म्हणून बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पदाधिकार्यांनी बजाज फायनान्सच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी अंमळनेर शहरात घडली.
तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांनी घेतलेल्या पर्सनल लोनचा एक हफ्ता थकल्याने बजाज फायनान्सचे कर्मचारी त्यांच्या घरी गेले होते. मात्र, पत्नी एकटी घरी असताना वसूली कर्मचार्यांनी दादागिरी केली. वसुलीसाठी बजाज कंपनीच्या कर्मचार्यांची दादागिरी बाबत अनेक शेतकर्यांनी तक्रारी केल्या होत्या. यामुळे शिंदे गटाचे संतप्त पदाधिकार्यांनी मंगळवार १० रोजी सायंकाळी अमळनेर शहरातील न्यू प्लॉट भागातील बजाज फायनान्स कार्यालयाची तोडफोड केली.
घटनेने फायनान्स कंपनी कार्यालयातील कर्मचारी घाबरून पळून गेले. कार्यालयातील खुर्च्या, टेबल, संगणक यांची तोडफोड करण्यात आली. याबाबत शाखा व्यवस्थापक विकास सुभाष पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. दरम्यान, याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…