ताज्याघडामोडी

पीटीच्या शिक्षकांनेच विद्यार्थिनीसोबत केलं अश्लील कृत्य

शहरातील सिडको परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली असून एका शाळेतील पिटी शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमन म्हणजेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील सिडको परिसरात असलेल्या त्रिमूर्ती चौक परिसरातील एका शाळेत दहा वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने गैरवर्तन केले आहे. शुक्रवारी दुपारी विद्यार्थिनी शाळेत असताना तिच्याशी जवळीक साधून मनात लज्जा उत्पन्न होईल असे असभ्य व अश्लील वर्तन केले. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीने अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शाळेतील शारीरिक शिक्षण या विषयाच्या शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शारीरिक शिक्षण विषयाचा शिक्षक असलेला संशयित रवींद्र नाकील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको परिसरातील पाटील नगर येथे असलेल्या पेठे विद्यालयात हा प्रकार शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी शिक्षकाचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे शाळेत आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर शहरात तीव्र अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या असून शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. विद्यार्थिनीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत शिक्षकाने गैर कृत केले आहे. या घटनेनंतर तात्काळ पोलिसात धाव घेतली असून संशयित आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

3 weeks ago