बायकोचा राग हा भल्या भल्या नवऱ्यांना धडकी भरवतो. कारण, बायको रुसली तर तिची समजूत काढेपर्यंत नवऱ्यांच्या नाकी नऊ येऊ शकतात. अशाच एका रुसलेल्या बायकोला मनवण्यासाठी पोलिसाने सुट्टीचा अर्ज केला आहे.
घटना नेपाळ सीमेलगत असलेल्या उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पोलीस शिपायाने सुट्टीचा अर्ज देताना जे कारण दिलं आहे, त्यामुळे त्याचा अर्ज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या पोलीस शिपायाचं लग्न अवघ्या महिन्याभरापूर्वी झालं आहे. त्याने लग्नानंतर फारशी सुट्टी घेतली नव्हती. तो लगेचच कर्तव्यावर हजर झाला. आता त्याला सुट्टी मिळत नसल्याने त्याची बायको त्याच्यावर नाराज झाली आहे. त्याने फोन केला तरी ती फोन उचलत नाही. फोन केल्यानंतर ती फोन उचलते आणि अजिबात न बोलता आपल्या सासूकडे देऊन टाकते. त्यामुळे त्याने सुट्टीचा अर्ज केला आहे. या अर्जात त्याने बायकोच्या वरील वर्तनाचा उल्लेख केला आहे.
अर्जात पुढे म्हणतो की, मी बायकोला शब्द दिला होता की, पुतण्याच्या वाढदिवसाला मी घरी नक्की येईन. कृपया 10 जानेवारीपासून मला सात दिवसांची रजा देण्याची कृपा करावी, मी आपला आभारी राहीन, असंही तो या पत्रात म्हणाला आहे. त्याचा अर्ज मंजूर करण्यात आला असून त्याला सातऐवजी पाच दिवसांची रजा देण्यात आली आहे. त्यानंतर तो पत्नीला भेटण्यासाठी रवाना झाला आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…