ताज्याघडामोडी

शाळेत जाताना आधी छेड काढली, मग अल्पवयीन मुलीला बळजबरीने लावला कुंकू

शाळेमध्ये जाताना आधी अल्पवयीन मुलीची छेड काढली. त्यानंतर घरात कोणी नसल्याचे पाहून बळजबरीने अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी घातली. आणि तिच्या भांगेत बळजबरीने कुंकू लावत तिची छेडछाड काढण्यात आली. ही घटना परभणीच्या पालम तालुक्यातील रामापूर येथे घडली. या प्रकरणी एका आरोपी विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पालम पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर लक्ष्मण फुगनर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पालम पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास फौजदार सुप्रिया केंद्रे करत आहेत.

पालम तालुक्यातील बनवस येथील एका शाळेत पीडित १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी शिकते. ती शाळेत जात असताना रामापूर येथील ज्ञानेश्वर लक्ष्मण फुगनर (वय २० वर्षे) याने तिची छेड काढली. तरीही सदर मुलीने भितीपोटी घरी कोणालाही सांगितले नव्हते. परंतु मंगळवारी घरी कोणी नसल्याचे पाहून आरोपी ज्ञानेश्वर फुगनर हा मुलीच्या घरी गेला. तेव्हा ‘तू माझ्यासोबत लग्न कर, नाही म्हटलीस तर तुला पळून नेऊ’ अशी धमकी फुगनर याने पीडित मुलीला दिली. यावेळी आरोपीने बळजबरीने पीडित मुलीच्या डोक्यात लग्नाच्या मागणीचे कुंकू भरत तिची छेडछाड करण्यास सुरुवात केली.

पीडित मुलीने आरडा केल्यानंतर तिची बहीण घरात आली. तेव्हा आरोपी ज्ञानेश्वर फुगनर याने घरातून पळ काढला. त्यानंतर पीडित मुलीने हा प्रकार घरातील इतर सदस्यांना सांगितला. मग बुधवारी पालम पोलीस ठाणे गाठून पीडित मुलीने फिर्यादी दिली. त्यावरून पालम पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर फुगनर याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधात पथक पाठवण्यात आले. त्यात आरोपीची माहिती मिळाल्यानंतर फौजदार सुप्रिया केंद्रे यांनी आरोपी ज्ञानेश्वर फुगनर याला रामपूर येथून अटक केली. आधिक तपास फौजदार सुप्रिया केंद्रे करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

3 weeks ago