एखाद्या हॉरर चित्रपटात चमत्कारिक प्रकार घडावा असार प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील उमरी येथील एका घरात दिवसाढवळ्या अविश्वसनीय घटना घडली आहे.
धान्याच्या डब्यांसह कपडे भरलेल्या कपाटामध्ये पाणी साचते तर वस्तू आपोआप सरकत असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत भंडारा जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
उमरी येथे सुमेध मेंढे कुटुंबासह राहतात. सुमेध, पत्नी, हर्षल (11) आणि निखिल (18) अशी दोन मुले आहेत. तीन वर्षांपासून सुमेध, पत्नी व हर्षल घरात राहत आहेत. मात्र, घरी अविश्वसनीय प्रकार घडत असल्याचा दावा त्यांनी स्वतः केला आहे. सहा महिन्याआधी अचानक दुपारच्या वेळी घरी धान्याच्या डब्यांत आणि भाजीच्या पोतळ्यात आपोआप पाणी जमा झाल्याचे लक्षात आले. तेथून या सगळ्या चमत्कारिक घटनांची सुरुवात झाली.
आठवड्यापासून तर या घरामध्ये चमत्कारिक घटनांची मालिका सुरू असल्याचा दावा आहे. गॅस ओट्यातून पाणी गळणे, स्वयंपाकाची इलेक्ट्रिक शेगडी आपोआप खाली पडून फुटणे अशा घटना घडत आहेत. मात्र, प्रत्यक्षात ते घडताना सुमेधचा मुलगा हर्षल आणि पुतणी व्यतिरिक्त कुणीच बघितले नाही.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…