ताज्याघडामोडी

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघात नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर

आ.समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्यास यश   

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये नवीन डीपी बसविण्यासाठी आणि क्षमतावाढसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ६ कोटी ४९ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकरी जनतेच्या जिव्हाळ्याची बाब असणाऱ्या डीपी सारख्या मुद्द्यावर आ. आवताडे यांनी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा सदर भरीव पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यासाठी उपलब्ध केला आहे. पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या अनेक गावांमध्ये नवीन डीपी मंजूर व्हावेत व असणाऱ्या डीपी क्षमतावाढ व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी आ.आवताडे यांच्याकडे मागणी केली होती. सदर मागणी लक्षात घेऊन आ. आवताडे यांनी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे ओलीताखाली असेलेल्या पीकक्षेत्रांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये यासाठी या निधीची तरतूद आपल्या पदरात पाडून घेतली आहे.

पंढरपूर तालुक्यातील डीपी मंजूर असणाऱ्या गावांची नावे व डीपी संख्या पुढीलप्रमाणे – पंढरपूर शहर ११ डीपी, गादेगांव २ डीपी, कोर्टी ३ डीपी, वाखरी ४ डीपी, लक्ष्मी टाकळी ३ डीपी, कासेगाव २ डीपी, बोहाळी १ डीपी, उंबरगाव २ डीपी, खर्डी ३ डीपी, तपकीरी शेटफळ १डीपी, तनाळी १ डीपी.

मंगळवेढा तालुक्यातील डीपी मंजूर असणाऱ्या गावांची नावे व संख्या पुढीलप्रमाणे – मंगळवेढा शहर १२ डीपी, आंधळगाव ७ डीपी, खुपसंगी २ डीपी, गणेशवाडी १ डीपी, कचरेवाडी १ डीपी, लोणार ३ डीपी, भोसे ३ डीपी, नंदेश्वर २ डीपी, जालिहाळ १ डीपी, कात्राळ १डीपी, हुलजंती ३ डीपी, कागष्ट २ डीपी, येळगी १ डीपी, नंदूर १ डीपी, देगांव ३ डीपी, धर्मगांव १ डीपी, गुंजेगाव १डीपी, घरनिकी १ डीपी, शिरसी १ डीपी, शेलेवाडी १ डीपी, लक्ष्मी दहिवडी १ डीपी, सलगर बु.१ डीपी, सलगर खु.१ डीपी, येळगी १ डीपी, मरवडे १ डीपी, कात्राळ २ डीपी, अरळी २ डीपी, डोणज १ डीपी, चिक्कलगी २ डीपी, रड्डे २डीपी, लवंगी १ डीपी, माचणूर २ डीपी, दामाजीनगर १ डीपी, उचेठाण २ डीपी, बठाण १ डीपी, लोणार ३ डीपी, अरळी २ डीपी, बालाजीनगर २ डीपी, सिद्धापूर १ डीपी.

 पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रातील डीपी उभारणी व क्षमतावाढीसाठी आमदार समाधान आवताडे यांच्या अथक प्रयत्नांतून तब्बल ६ कोटी ४९ लाख रुपये निधी मंजूर झाल्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा मिळणार आहे. सदर विकसनशील आणि शेतकरीहितकारक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. समाधान आवताडे यांची विकासाभिमुख कार्याची प्रतिमा आणखी मजबूत झाली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago