जागेचा वाद इतका विकोपाला गेला की, पुतण्याने काकासह चुलत भावावर प्राणघातक हल्ला केला.हल्ल्यात चुलत भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर एक जण गंभीर झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
यवतमाळ शहरातील पांढरकवडा मार्गावरील स्मशानभुमीसमोरील जागेच्या वादातून पुतण्याने काकासह चुलत भावावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चुलत भावाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही धक्कादायक सायंकाळच्या सुमारास घडली. राहुल पाली (27 ), असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नरेंद्र पाली (50) असे गंभीर जखमीचे नाव आहे. तर सूरज पाली, असे संशयीत मारेकऱ्याचे नाव आहे. नविन वर्षांच्या पहिल्याच आठवड्यात तिसऱ्या खुनाच्या घटनेची नोंद झाली.
स्मशानभुमीसमोर पाली कुटूंबीय वास्तव्यास आहे. दुपारी त्या ठिकाणी बोअरवेलचे काम सुरू होते. संशयीत सूरज पाली याचा काका नरेंद्र, चुलत भाऊ राहुल याच्यासोबत चांगलाच वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात सूरज याने चक्क लोखंडी रॉडने काका नरेंद्र आणि चुलत भाऊ राहुल याच्यावर प्राणघातक हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात दोघेही खाली पडले होते. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
उपचारा दरम्यान राहुल पाली याचा मृत्यू झाल्याचे माहिती डॉक्टरांनी दिली. तर गंभीर जखमी असलेल्या नरेंद्र पाली यांच्यावर उपचार सुरू आहे. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू आहे. या खून प्रकरणात संशयीत सूरज पाली याच्यासह दोन ते तीन जणांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस करीत आहे. राहुल पाली हत्या प्रकरणातील संशयीत मारेकऱ्यांची नावे पोलिसांसमोर असून स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची टीम मारेकऱ्यांच्या शोधात रवाना करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…