ताज्याघडामोडी

धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12 : 30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

अपघातामध्ये धनंजय मुंडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातामध्ये मुंडे किरकोळ जखमी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये धनंजय मुंडे हे किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघातामध्ये मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. ‘अफवांवर विश्वास ठेवू नका’ दरम्यान या अपघाताबाबत धनंजय मुंडे यांनी स्वत: माहिती दिली आहे. ‘मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये’, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago