आळंदी जवळील चऱ्होली बुद्रुक येथे मित्राची हत्या करून स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याची घटना उजेडात आली आहे. हा सर्व खटाटोप प्रेयसीसोबत पळून जाण्यासाठी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
सुभाष थोरवे असे 58 वर्षीय आरोपी प्रियकराचे नाव आहे. तर रविंद्र घेनंद अस हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे. सुभाषच्या कुटुंबाने त्याचा अपघातात मृत्यू झाला असं समजून दशक्रिया विधी घातला.
सुभाष हा प्रेयसीसोबत जेजुरीत पळून गेला होता. स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून मित्राची हत्या केल्याची माहिती प्रेयसीला देण्यात आली. त्यामुळं घाबरलेली प्रेयसीने घरी जाण्याचा तगादा लावला.
सोबत असलेले पैसे संपल्याने तो अत्यंत बिकट अवस्थेत होता. तो चुलत बहिणीकडे पायी जात असताना त्याला चोर समजून तेथील स्थानिक नागरिकांनी मारहाण देखील केली.
सुभाष थोरवेने स्वतः नाव सांगताच नागरिकांनी चुलत बहिणीला बोलावलं आणि सुभाषला बघताच बहीण बेशुद्ध पडली. स्थानिकांनी आळंदी पोलिसांना बोलावून सुभाषला ताब्यात दिलं आणि स्वतःच्या मृत्यूचा बनाव केल्याचं बिंग फुटलं.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…