ताज्याघडामोडी

व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्याने जीभचं कापली

व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी एकाला बेदम मारहाण करत जीभ कापल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील फुरसुंगी भागात ही धक्कादायक घटना घडली असून, याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २८ डिसेंबर रोजी घडला. तक्रारदार दाम्पत्य व आरोपी एकाच सोसायटीत वास्तव्यास आहेत. 

 

सोसायटीतील रहिवाशी असणाऱ्या व्यक्तींचा तक्रारदारांच्या पतीने “ओम हाईट्स ऑपरेशन” या नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. त्यात सर्व सदस्य ही होते. तक्रारदार यांचे पती या ग्रुपचे अ‍ॅडमिन होते. 

दरम्यान, त्यांनी यातील एका व्यक्तीला जो याप्रकरणात आरोपी आहे. त्या ग्रुपमधून रिमूव्ह म्हणजे काढून टाकले.गोष्टीचा त्यांनी तक्रारदारांच्या पतीला विचारणा केली. मात्र त्यांना काही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी तक्रारदारांच्या पतीला फोन करून भेटायचे आहे, असे सांगून भेटण्यास बोलावले.

त्यावेळी ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मेसेज करत असल्याने ग्रुपच बंद केला असल्याचे सांगितले, असता आरोपीने पाच जणांसोबत येऊन तक्रारदारांना मारहाण केली. त्यांच्या तोंडावर बुक्की मारली, या बुक्कीचा फटका इतका जोरात होता की दातासह जिभेवर त्याचा मार लागला यात ते जखमी झाले असून त्यांच्या जिभेला टाके पडले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

6 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago