नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक’ असा उल्लेख केल्यावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. बारामतीतल्या भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी करत अजित पवारांचा पुतळा जाळला.
यावेळी ‘अजित पवार हाय हाय, धरणवीर अजित पवार.. ‘अशा घोषणा देण्यात आल्या. भाजपच्या वतीने भिगवन चौकात आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
मात्र पोलिसांना गुंगारा देत अचानक कार्यकर्ते अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर एकत्र आले आणि जोरदार घोषणाबाजी करत पवार यांच्या पुतळ्याचे दहन केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…