दिवसेंदिवस महागाई वाढते आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. यातच आता नवीन वर्षात गॅस दरवाढीची भेट सर्वसामान्यांना मिळाली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे.घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणतीही वाढ झाली नाही. कमर्शियल गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल, धाबे आदीवरील जेवण महागले. गॅस दरवाढीमुळे जेवणाचा बेरंग होण्याची शक्यता आहे.
1 जानेवारी 2023 रोजी या दरवाढीनंतर दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1769 रुपये झाली. दिल्लीत घरगुती गॅसची किंमत 1053 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये, कोलकत्त्यात 1079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये भाव आहे. तर सरत्या वर्षात घरगुती गॅसच्या किंमतीत 4 वेळा बदल झाला. चार वेळा गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ झाली. एकूण 153.50 रुपयांची दरवाढ झाली. कोलकत्त्यात गॅस सिलेंडर 1870 रुपये, मुबंईत 1721 रुपये तर चेन्नईमध्ये 1917 रुपये भाव होता. यापूर्वी केंद्र सरकारने सरत्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजीच्या किंमतीत 115.50 रुपयांची कपात झाली.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…