ताज्याघडामोडी

सुनेसाठी सासऱ्याने दिली आत्महत्येची धमकी, नातवासह चढला पाण्याच्या टाकीवर आणि…

बऱ्याचदा नात्यातील समस्यांमुळे कौटुंबिक वाद उद्भवतात. काहीवेळा अशा वादातून गुन्हे घडतात. मात्र राजस्थानमध्ये कौटुंबिक वादातून घडलेली घटना काहीशी वेगळी होती.

दोन वर्षाच्या नातवासह एक वृद्ध व्यक्ती पाण्याच्या टाकीवर चढली. माझी सून दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत आहे. ती घरी परतली नाही तर मी नातवासह टाकीवरून उडी मारून आत्महत्या करेन, असं त्याने प्रशासनाला सांगितलं. या वृद्ध व्यक्तीने दिलेली ही धमकी ऐकून परिसरात एकच खळबळ उडाली.

 

अखेरीस पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना या वृद्ध व्यक्तीची समजूत काढण्यात यश आलं. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ही व्यक्ती पाण्याच्या टाकीवरून सुखरूप खाली उतरली. राजस्थानमधील बरन येथील छाबरा गावातील एक व्यक्ती त्याच्या दोन वर्षाच्या नातावाला घेऊन पाण्याच्या टाकीवर चढल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर तिथेच उभे राहून त्याने त्याची सून अन्य व्यक्तीसोबत राहत आहे, ती घरी परतली नाही तर मी नातवासह टाकीवरून उडी मारून आत्महत्या करेन, असं प्रशासनाला सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कौटुंबिक वादाचं आहे. राधेशाम खाती यांचा मुलगा विनोदचा काही वर्षांपूर्वी राखी नावाच्या युवतीशी विवाह झाला. विनोद आणि राखीला दोन वर्षाचा मुलगा आहे. पण एकेदिवशी अचानक राखी माहेरी पळून गेली.

त्यानंतर ती दुसऱ्या एका युवकासोबत विनोदच्या घरासमोर दुसरं घर घेऊन राहू लागली. यामुळे विनोद आणि त्याचे कुटुंबीय तणावात आहेत. सुनेला अनेकदा समजवून सांगण्याचा प्रयत्न करूनही ती सासरी परतली नाही. ती अजूनही दुसऱ्या युवकासोबत राहत आहे.

राधेशाम खाती नातावासह पाण्याच्या टाकीवर चढल्याचे समजताच पोलीस आणि प्रशासनाला कळवण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी राधेशाम खातींना समजवण्याचा हरतऱ्हेनं प्रयत्न केला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार समाधान आवताडे ॲक्शन मोडवर पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांचेसमोर भ्रष्ट अधिकाऱ्यांना फोडला घाम

प्रतिनिधी-जिल्हा नियोजन भवन, सोलापूर येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे…

12 hours ago

आवताडे शुगर कडून २८०० रुपये प्रति टन याप्रमाणे ऊस बिल खात्यावर जमा – चेअरमन संजय आवताडे

प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज…

3 weeks ago

सफाई कर्मचाऱ्यांच्या मेडिक्लेम बाबत ज्या बँकेची चांगली पॉलिसी असेल ती पॉलिसी लागू करावी -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर, दिनांक 2(जिमाका):- जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा…

4 weeks ago

सोलापूर जिल्ह्यात महिला समृद्धी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक यांचे आवाहन

सोलापूर दि.1 जानेवारी 2025 (जिमाका) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत मांग, मातंग,…

4 weeks ago

पंढरपूरसाठी आमदार अभिजित पाटील यांची मोठी मागणी ‘केंद्रीय कृषी उडान योजना २.०’ अंतर्गत पंढरपुर परिसरात विमानतळ करावे

पंढरपुर येथे 'केंद्रीय कृषी उडान योजना २.०' अंतर्गत विमानतळ व्हावे या मागणीसाठी आमदार अभिजित पाटील…

1 month ago

हॉस्टेलमधून पळाली, 4 जिल्हे भटकली, विद्यार्थिनीवर 4 ठिकाणी 4 जणांकडून अत्याचार, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!

महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…

1 month ago