औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
तरमळे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर याप्रकरणी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिकेत अशोक नागे, राजु बनकर,आकाश अशोक नागे, दिनेश राठोड, अशोक रामनाथ नागे, सुनिल रुपचंद खरात, पांडुरंग भाकचंद नागे (सर्व रा. बोकुडजळगांव पैठण) असे आरोपींचे नावं आहे.
काही दिवसांपूर्वी बोकुड जळगाव येथे ग्रामपंचायत निवडणुक पार पडली होती. ज्यात भाऊसाहेब तळमळे यांच्या आई सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होत्या. यात त्यांचा विजय देखील झाला होता. दरम्यान याच निवडणुकीचा राग मनात ठेवून विरोधी गटातील अनिकेत नागे याने हातातील चाकुने भाऊसाहेब तरमळे यांच्यावर शनिवारी रात्री अचानक हल्ला केला. भाऊसाहेब यांच्या डोक्यावर, मानेवर चाकुचा मार लागला आहे. या हल्ल्यात भाऊसाहेब गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात सात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…