ताज्याघडामोडी

कपडे खरेदीसाठी गेलेल्या युवकाला मॉलमध्ये बेदम मारहाण; एक दिवस कोंडूनही ठेवले

मॉलमध्ये चोरीच्या संशयावरून युवकाला मॉल मालकासह सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिक शहरात नव्याने सुरू झालेल्या मॉलमध्ये ही घटना घडली आहे. चोरीच्या संशयावरून युवकाला मारहाण करण्यात आली आहे. त्यात तो गंभीरपणे जखमी झाल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर त्याला एक दिवस मॉलमध्ये कोंडून देखील ठेवण्यात आले असल्याचं त्याने जबाबात म्हटले आहे.

दरम्यान सुटका झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित संचालकांसह सुरक्षारक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी आहे की, मॉलमध्ये फिर्यादी युवक कपडे खरेदीसाठी गेला होता. मात्र त्यावेळी त्याच्यावर शर्ट चोरी केल्याचा आळ घेत अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली.

संशयित मारहाण करून थांबले नाही तर त्यानंतर त्याला एक दिवस तिथेच डांबून ठेवण्यात आले. मात्र कशीबशी सुटका झाल्यानंतर तो घरी पोहोचला आणि घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. अशी माहिती जखमी युवकाने पोलिसांना दिली आहे. तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर गंगापूर पोलिसांना या सर्व प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. तेव्हा गंगापूर पोलिसांनी तात्काळ धाव घेत रुग्णालय गाठले होते.

पोलिस रुग्णालयात दाखल झाल्यानंतर युवकाचा जबाब नोंदविण्यासाठी त्याच्याकडे गेले मात्र त्यावेळी युवक बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याचा जबाब नोंदविण्यात आला. तरुणाच्या तक्रारीवरून मॉलचे संशयीत चालक आणि सुरक्षारक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंडविदायक कलम ३२४, ३४२ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेबाबत अधिक तपास सहाय्यक निरीक्षक नरेंद्र म्हैसाणे हे करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago