बुलढाण्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भिकाजी घुगे यांना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुलढाण्यात मोठी कारवाई केली. जिगाव प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा वारसा हक्काने मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यम प्रकल्पाचे भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी लाच मागितली होती. याचा पहिला हफ्ता स्वीकारताना एसीबी त्यांना अटक केली. काल (28 डिसेंबर) दुपारी साडेचारच्या सुमारास केलेली ही कारवाई मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्याची जिगाव प्रकल्पात जमीन गेली होती. त्यात वडिलांच्या नावाऐवजी काकाचे नाव यादीत आल्याने ते नाव बदलून घेण्यासाठी तो कार्यालयात आला होता. परंतु या प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा वारसा हक्काने मिळणाऱ्या रकमेच्या 10 टक्के रक्कम लाच उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी मागितली होती. शेतकऱ्याला मिळणारी संपूर्ण रक्कम 21 लाख होती त्याची 10 टक्के रक्कम म्हणजे 2 लाख 17 हजार रुपयांची लाच घुगे यांनी मागितली होती. त्याचा एक लाख रुपयांचा पहिला हफ्ता स्वीकारताना भूसंपादन उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यात त्यांचा लिपिक नागेश खरात आणि वकील अनंत देशमुख अशा तीन आरोपींना अटक केली आहे. पुढील कारवाई सुरु आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…