ताज्याघडामोडी

प्रियकराच्या मदतीने आईचा काटा काढला, अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल

आई आपल्या प्रेम प्रकरणावरुन सतत टोचत असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करुन आईचा खून केल्याचा आरोप आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात हा प्रकार घडला आहे. हत्येनंतर मुलगी आणि तिचा प्रियकर हे दोघेही जण पसार झाले आहेत. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन घेतला असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

ठाण्यातील मुंब्रा परिसरातील आंबेडकर नगर येथील फातिमा हाईट्स या इमारतीत राहणाऱ्या एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आपल्या १७ वर्षीय मुलीचे एका तरुणासोबत प्रेम संबंध असल्याचे आईला समजले. त्यानंतर आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करून आईने प्रियकरासोबत असलेल्या नात्यावरून तिला वारंवार टोकण्यास सुरुवात केली. त्याच रागातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मेहंदी हाश्मी असे मृत्यू झालेल्या आईचे नाव आहे. हत्या करणारी अल्पवयीन मुलगी आणि तिचा प्रियकर हे दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सबा यांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांना फोन केला असता त्यांचा फोन बंद लागत होता. त्यानंतर नातेवाईकाने मुलीला फोन केला, मात्र तिच्याकडूनही कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकाला संशय आला आणि त्यांनी सबा यांच्या राहत्या घरी धाव घेतली. घराला बाहेरून कुलूप होते आणि घराच्या आतून फोनच्या रिंगचा आवाज येत असल्याने नातेवाईकांचा संशय बळावला आणि त्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी सबा या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत जमिनीवर पडल्या होत्या त्यानंतर या हत्येचा उलगडा झाला. यावेळी सबा यांच्या मानेवर, गळ्यावर, छातीवर धारदार सुरीने वार करून त्त्यांना जीवे ठार मारल्याचे आढळून आले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

3 weeks ago