अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अचानक पोट दुखू लागल्याने आईने तिला डॉक्टरांकडे नेले. या मुलीची तपासणी करताच डॉक्टरांना धक्काच बसला.१४ वर्षीय मुलगी आठ महिन्यांची गर्भवती असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं.डॉक्टरांनी याची माहिती आईला सांगताच, आईच्या पायाखालची जमीनच सरकली.
याबाबत मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, गावातील एका तरुणाने आपल्यावर अत्याचार केली असल्याची कबूली या मुलीने आईला दिली. मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच आईने थेट पोलीस स्टेशन गाठलं.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, अकोला पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली आहे. वैभव विजय गोंडकार असं आरोपी तरुणाचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे वैभव सोबत गेल्या दोन वर्षापासून संबंध होते.
पीडितेचे आई-वडील हे वेगवेगळे राहतात. लॉकडाऊनमध्ये पीडिता व तिची आई मुंबई येथे वास्तव्यास होते. त्यानंतर ते गावात आले. यानंतर पीडिता आणि तिच्या आईने अकोला येथील एका शॉपीमध्ये काम सुरू केले. त्यावेळी आरोपी वैभव हा सुद्धा अकोला येथे चकरा मारीत होता.
यादरम्यान, आरोपी वैभवने पीडित मुलीला फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर वेळोवेळी त्याने पीडितेसोबत शारिरीक संबंध ठेवले. यादरम्यान, पीडिता ही गरोदर राहिली. अचानक पोटात दुखू लागल्याने आईने तिला डॉक्टरांकडे नेले असता, ती गरोदर असल्याचं उघड झालं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख व पंचायत समितीचे माजी सदस्य, श्री विठ्ठल…
पर्यावरण संरक्षणसाठी संबोधनासह केले विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ…
कु. सोनिया नवले यांची अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या इलिनॉईस विद्यापीठातून एम.एस. पदवी संपादन एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी…
प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या…
संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…