ताज्याघडामोडी

तारीख ठरली, पण साखरपुड्याच्या आठवडाभरापूर्वीच तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका 23 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

कन्नड शहरातील जवाहर कॉलनीत राहणाऱ्या प्रियंका बारकू वायडे (वय 23) या तरुणीने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे लग्न निश्चित झाले असून, येत्या चार जानेवारीला तिचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता. मात्र त्यापूर्वीचं तिने टोकाचे पाऊल उचलेले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, घरात आई-वडील नसताना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रियंकाने घराच्या समोरील दरवाजाला कुलूप लावून मागील दरवाजाने घरात प्रवेश केला. त्यानंतर दरवाजाची कडी आतून लावून पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी प्रियंकाची आई मुलाला शाळेतून आणून घरी गेल्या असता दरवाजाला कुलूप दिसले. त्यांनी शेजाऱ्यांकडे मुलीने चावी ठेवली आहे का, अशी विचारणा केली. मात्र कुणाकडेही चावी ठेवलेली नव्हती. त्यानंतर त्यांनी पतीला फोन करून घराला बाहेरून कुलूप लावलेले असून, प्रियंका घरी नसल्याचे सांगितले. त्यामुळे ते तात्काळ घरी आले. त्यानंतर खिडकीतून डोकावून पाहिले असता, किचनमधील पंख्याला प्रियंकाने गळफास घेतल्याचे दिसून आले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 day ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

7 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago