पुण्यात गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आळंदी परिसरात असणाऱ्या चऱ्होली भागात एका ६५ वर्षीय व्यक्तीने ४८ वर्षीय व्यक्तीचा खून केला. मृताचे डोके धडापासून वेगळे करून त्याला स्वतःचे कपडे घालून घटनास्थळावरून तो पसार झाला. हा आरोपी फरार होण्याच्या प्रयत्नात असताना दशक्रिया विधीनंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात आळंदी येथील चऱ्होली खुर्द या गावामध्ये एखाद्या सिनेमाला कथा शोभावी असा प्रकार समोर आला आहे. कारण अंत्यसंस्कार झालेला व्यक्तीच चक्क खुनाचा आरोपी निघाला. महिलेशी असणाऱ्या प्रेम संबंधातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हा आरोपी फरार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
रवींद्र भिमाजी घेनंद (वय ४८, रा. धानोरे, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे (वय ६५, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी निखिल रवींद्र घेनंद (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १६ डिसेंबर रोजी रात्री घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी सुभाष थोरवे याचे स्वतःचे शेत आहे. रवींद्र घेनंद आणि त्याची चांगली ओळख होती. आरोपीचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्याला महिलेसोबत लांब कुठे तरी जाऊन राहायचे होते. त्यामुळे त्याने स्वतःचा मृत्यूचा बनाव रचण्यासाठी त्याने घेनंद यांना गोड बोलून शेतामध्ये नेले. त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करत मानेपासून डोके वेगळे करून त्यांचा खून केला. त्यानंतर, स्वतःच्या अंगावरील कपडे घेनंद यांच्या मृतदेहावर घालून त्यांना रोलरमध्ये घालून फिरवले आणि अपघाताचा तसेच स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…