छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात लव्ह ट्रँगलमधून हत्येची घटना समोर आली आहे. शनिवारी कोरबा येथील पंप हाऊस कॉलनीत स्क्रू ड्रायव्हरने वार करुन तरुणीची हत्या करण्यात आली.
याप्रकरणी आता धक्कादायक खुलासा झाला आहे. शॉर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, तरुणीच्या मानेवर, छातीवर आणि शरीराच्या इतर भागात स्क्रू ड्रायव्हरसारख्या धारदार वस्तूने 26 वार करण्यात आले होते. तिचा प्रियकर शाहबाद खान याने तिची हत्या केली होती. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण – नील कुसुम या तरुणीला मारण्यासाठी शाहबाद खान विमानाने गुजरातहून कोरबा येथे आला होता. तरुणीचे दुसरे कोणावर तरी प्रेम आहे या संशयावरून त्याने तिची हत्या केली. फरार शाहबादच्या शोधात पोलिसांची 4 पथके गुंतली आहेत. नातेवाइकांनी सांगितले की, नील कुसुम हिने मदनपूर (करताळा) शाळेत 9वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण घेतले होते.
आरोपी शाहबाद हा जशपूरचा रहिवासी आहे. तसेच तो कंडक्टर आहे. तरुणी ज्या बसमधून दररोज प्रवास करत असे, त्या बसचा तो कंडक्टर होता. दोघांमध्ये संवाद वाढू लागला आणि प्रेमसंबंध निर्माण झाले.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर नील कुसुम घरीच राहून पुढील शिक्षणाची तयारी करत होती. तिच्या वडिलांनी सांगितले की, यावर्षी तिला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता, परंतु काही कारणास्तव त्याला यंदा प्रवेश मिळू शकला नाही, म्हणून 2023 मध्ये प्रवेश घेण्याची तयारी होती. दरम्यान, नील कुसुमने तिचा प्रियकर शाहबादसोबतचा बोलणेही हळूहळू कमी केले. सध्या शाहबाद गुजरातमधील एका कंपनीत काम करत होता.
तेथून तो जेव्हा-जेव्हा मुलीला फोन करण्याचा प्रयत्न करत असे, तेव्हा तिचा मोबाईल अनेकदा व्यस्त असायचा. त्यामुळे तिचे आणखी कुण्या तरुणाशीही अफेअर असल्याचा शाहबादला संशय होता. त्याला पाथळगाव येथील आशिष केरकेट्टा याचे कुसुमशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याबाबत त्याने कुसुमला अनेकदा जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
आशिष हा कुसुमचा दूरचा नातेवाईक होता आणि तो तिच्या घरी वारंवार येत असे. कुसुमने विश्वासघात केला असे शाहबाद वाटले आणि त्याने तिला जावे मारण्याची योजना आखली. कुसुमच्या हत्येची पूर्ण तयारी करून तो गुजरातहून विमानाने कोरबाला पोहोचला होता. येथे आल्यानंतर त्याने कुसुमशी संपर्क साधला.
24 डिसेंबर रोजी कुसुमने त्याला तिच्या घरी बोलावले. याठिकाणी शाहबादने प्रेमाचे वचन देऊन तिच्याशी आधी शारीरिक संबंध ठेवले, त्यानंतर सोबत आणलेल्या स्क्रू ड्रायव्हरने तिच्या अंगावर 26 हून अधिक ठिकाणी हल्ला केला. कुसुम आरडाओरडा करू नये म्हणून त्याने उशीने तिचे तोंड दाबले होते. तसेच घटनेनंतर आरोपी तरुणाने मोबाईल बंद करून तेथून पळ काढला.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…