चिल्हार बोईसर रस्त्यावरील गुंदले गावच्या हद्दीतील मामाचा गाव रिसॉर्ट मधील तरण तलावात बुडून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. बेशुद्धावस्थेत त्याला नागझरी नाक्यावरील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, परंतु उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नाताळ सुट्या आणि नववर्ष साजरे करण्यासाठी मयत मुलाचे कुटुंबीय रिसॉर्ट मध्ये आले होते. सोमवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घटना घडली आहे.रुद्र देविदास वाडकर (वय.9 वर्ष) असे मयत मुलाचे नाव असून तो डहाणू तालुक्यातील कासा गावाचा रहिवासी होता.
रिसॉर्ट मधील तरणतलावात लाइफ गार्ड नसल्याने मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मयत मुलाचे कुटुंबीय नाताळ निमित्ताने रिसॉर्ट वर आल्याची माहिती समोर येत आहे. याच रिसॉर्टच्या मालकाचा तरण तलावाच्या उद्घाटन प्रसंगी तलावातील विजेच्या तारांमधून विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता, असे बोलले जात आहे.
चिल्हार बोईसर रस्त्यालगत रिसॉर्ट सुरू करण्यात आले आहेत. रिसॉर्टमधील तरण तलावात जीवरक्षकांची नियुक्ती केली जात नसल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये पर्यटकांचे बळी जात आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची मोफत व्यवस्था होत असल्याने रिसॉर्ट मधील सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जाते. मयत मुलांच्या मृत्यू प्रकरणी रिसॉर्ट मालक आणि व्यवस्थापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…