ताज्याघडामोडी

पप्पा-मम्मी मला माफ करा, काँग्रेस आमदाराच्या बंगल्यावर विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं; कारण…

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील काँग्रेस आमदार ओंकार मरकाम यांच्या बंगल्यावर एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा विद्यार्थी कॅन्सरने त्रस्त असून त्याच्यावर अभ्यासासोबतच आमदार निवासात उपचार सुरू होते.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृतदेहाजवळून पोलिसांना सुसाइड नोट सापडली आहे. यामध्ये वडिलांना उद्देशून विद्यार्थ्याने लिहिले आहे की, ‘पप्पा माझ्या मित्रांना सांगा की आता तीरथ नाही राहिला.’ पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. विद्यार्थी तीरथ हा सुमारे चार वर्षांपासून श्यामला हिल्स येथील आमदारांच्या शासकीय निवासस्थानी राहत होता. गळफास घेण्यापूर्वी त्याने सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण आजारपण असल्याचं सांगितले आहे.

सुसाईड नोटमध्ये तीरथने आई-वडील, काका, काकू आणि आजी-आजोबांची माफी मागताना लिहिले आहे की, त्यांनी आपल्यासाठी खूप काही केले. पण, तोच त्यांना नीट समजू शकला नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. श्यामला हिल्स पोलीस ठाण्याचे प्रभारी उमेश यादव यांनी सांगितले की, मृतदेहाचे पोस्टमार्टम करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago