ख्रिसमस आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे सुट्टीवर तसंच देवदर्शनाला राज्यातले नागरिक मोठ्याप्रमाणावर जात आहेत. इंदापूरचे महेंद्र घोगरे हेदेखील त्यांच्या 4 वर्षांच्या मुलासोबत गणपतीपुळ्याला देवदर्शनाला जात होते, पण एका चुकीमुळे या बाप-लेकांना जीव गमवावा लागला आहे.
इंदापूर तालुक्यातील भाविक सुट्टीमुळे गणपतीपुळ्याला देवदर्शनासाठी निघाले होते, पण त्यांच्या गाडीला सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे अपघात झाला आहे. हा अपघात कराड-रत्नागिरी राज्य महामार्गावरील कोकरूड येथे झाला आहे. या अपघातात इंदापूर तालुक्यातील बावडा गावातील बाप-लेकांना जीव गमवावा लागला आहे.
वारणा नदीवर असलेल्या कोकरूड-नेर्ले पुलावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या दुभाजकाला कार धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात महेंद्र अशोक घोगरे या 35 वर्षीय व्यक्तीचा आणि त्यांचा मुलगा महेंद्र घोगरे या 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हे दोघंही पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील बावडा-वकिलवस्तीचे रहिवासी आहेत. या अपघातामध्ये आणखी तिघेजण जखमी झाले आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…