ताज्याघडामोडी

फुकट अंडा राईस दिला नाही म्हणून पठ्ठ्याने काढले पिस्तूल!

फुकट अंडा राईस देण्यास नकार दिलेल्या हात गाडी चालकाला पिस्तुलाच्या धाकाने जिवे मारण्याची धमकी देऊन गल्ल्यातील पैसे घेऊन फरार झालेल्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन काडतुसे असे जप्त करण्यात आले आहे. बंड्या उर्फ काळुराम प्रशांत थोरवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात ही घटना घडली आहे. याबाबत स्वारगेट पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला गेला आहे.

फिर्यादीची स्वारगेट भागात हातगाडी आहे. आरोपीने त्याच्याकडे फुकट अंडा राईसची मागणी केली, मात्र त्याने नकार दिल्याने राग अनावर होऊन आरोपीने त्याला पिस्तुलाच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो गल्यातील अडीच हजार रुपये काढून पसार झाला. आरोपी आणि फिर्यादीची तोंड ओळख आहे. पुण्यातील आरोपी बंड्या हा गुलटेकडी भागात आल्याची माहिती मिळतात स्वागत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत शिंदे उपनिरीक्षक अशोक येवले अमलदार मुकुंद तारू सोमनाथ कांबळे आणि शेख यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

ऐतिहासिक यमाई तलाव होणार प्रदूषणमुक्त !

​माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ कोटींच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर पंढरपूर:…

2 days ago

यशवंतराव चव्हाण (यमाई) तलावात पाणी सोडण्यास सुरुवात

नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले…

4 days ago

स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिर : प्रणव परिचारक

11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व.…

4 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘प्रोटोटाईप/प्रोसेस डिझाईन अँड डेव्हलपमेंट’ विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न.

पंढरपूर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…

4 days ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथे विद्युत अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…

5 days ago

भाजी मंडईतील विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेत नगराध्यक्षा डॉ.प्राणिताताई भालकेयांची प्रत्यक्ष पाहणी.

पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.…

6 days ago