रिक्षा चालक श्रीकांत मिश्रा हा बुधवारी कल्याण रेल्वे स्थानकासमोर प्रवाशांची वाट पाहत होता. त्याच सुमाराला प्रीती ही रिक्षा जवळ येऊन भाडे विचारात होती. यावरून दोघांमध्ये वाद होऊन भांडण झाले. त्यावेळी पोलीस घटनास्थळी येऊन त्या महिला व रिक्षा चालक दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर या महिलेने गोंधळ सुरु करून अतिशय संतप्त होऊन ती मारहाण करण्यास धावत होती. तर रिक्षा चालक पोलीस ठाण्यात उपस्थित होता.
मिश्राची तक्रार करण्याऐवजी महिलेने रिक्षा चालकाला फैलावर घेऊन तुझ्यामुळे मला पोलीस ठाण्यात यावे लागले. मला मनस्ताप झाला, असे ओरडून बोलू लागली. अखेर पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. त्यावेळी पोलीस वाहनात बसताना या महिलेने पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
महिलेला पोलिसांनी तिचे नाव विचारले तर ‘तुम्ही मला नाव विचारणारे कोण, तुमची लायकी आहे का मला काही विचारण्याची. तुम्ही मला शांत राहण्यास सांगणारे कोण’ असे अर्वाच्च भाषेतील प्रश्न उपस्थित करुन महिलेने महिला पोलिसांना मारहाण करण्यास धावणे, त्यांना शिवीगाळ केली आणि नखांनी बोचकारे घेतले. शिवाय रिक्षा चालकाला शिवीगाळ करणे असे प्रकार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या महिलेचा गोंधळ एक तास भर सुरू होता.
दरम्यान, सरकारी कामात अडथळा निर्माण करून रिक्षाचालका मारहाण केल्या प्रकरणी महिला पोलीस शीला अंकुश बंदावणे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी प्रीती विरुध्द गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…