नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांसह सत्ताधारीही विविध मुद्यांवर आंदोलन करत असल्याने वातावरन तापले आहे. त्यातच शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास एका महिलेने स्वत:च्या अंगावर राॅकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकांनी महिलेला वेळीच पकडल्याने अनर्थ टळला.
कविता चव्हाण असे या महिलेचे नाव आहे. ती सोलापूर येथील रहिवासी आहेत. अधिवेशनाचा पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर एका महिला राॅकेल घेऊन आली. तेथे तिने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच सुरक्षारक्षकांनी तिला पकडल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रसंगी महिलेने छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतरही महापुरूषांचा अपमान केला जात असतांना सरकार त्यांच्यावर काहीही कारवाई करत नसल्याने संताप व्यक्त केला. या संतापातून वरील कृत्य केल्याचे माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…