ताज्याघडामोडी

नातींना भेटण्यासाठी आजोबा शाळेत आले, दहावीच्या विद्यार्थिनाला जवळ बोलवून लज्जास्पद वर्तन

नातींना भेटण्यासाठी आलेल्या आजोबांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप होत आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित प्रकार घडल्यानंतर गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने, प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेमुळे निवासी शाळेतील मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथील रहिवासी असलेल्या आरोपीच्या नाती गंगाखेड शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शिक्षण घेतात. याच ठिकाणी असलेल्या निवासी वसतिगृहामध्ये त्या वास्तव्यास आहेत.

आरोपी आपल्या नातींना भेटण्यासाठी आले असता त्यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या गावातीलच इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला त्यांनी जवळ बोलून घेतले. त्यानंतर वाईट उद्देशाने हात धरुन आपला विनयभंग केल्याचा आरोप तिने केला आहे. हा प्रकार घडल्यानंतर घाबरलेल्या मुलीने याची माहिती शाळेतील शिक्षकांना दिली.

त्यानंतर शिक्षकांनी घटनेचं गांभीर्य ओळखून गंगाखेड पोलीस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला भेट देऊन पाहणी केली आहे. या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली जाणार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago