मटणाची ग्रेव्ही चांगली नसल्याची तक्रार केल्याने झालेल्या वादातून हॉटेल चालकाने शटर बंद करून तिघा पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. कोपरखैरणेतील जगदंब हॉटेलमध्ये ही घटना घडली.
कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील कर्मचारी किरण साबळे व त्यांचे दोन सहकारी यांच्यासोबत ही घटना घडली आहे. गुरुवारी ते कोपरखैरणेतील जगदंब हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी त्यांना वाढलेल्या मटणाच्या ग्रेव्हीची चव नसल्याची तक्रार त्यांनी केली. यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना “खायचे असेल तर खा नाही तर नका घाऊ,” असे प्रतिउत्तर दिलं.
तिघा पोलिसांनी त्यांना ग्राहकांसोबत अशा प्रकारे उद्धट बोलण्याचा जाब विचारला. यावरून हॉटेल कर्मचारी आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी शटर बंद करून पोलिसांना डांबून ठेवून मारहाण केली. यामध्ये तिघेही पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये हॉटेल मालक अक्षय जाधव आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…