आपण सध्या एकविसाव्या शतकात वावरत आहोत. विज्ञानाच्या मदतीने विविध क्षेत्रांमध्ये आपण मोठी प्रगती केली आहे. तरीही काही व्यक्ती अंधश्रद्धा, जादूटोणा यांसारख्या गोष्टींच्या विळख्यात अद्याप अडकलेल्या आहेत.
आजही अनेकांचा अशा गोष्टींवर विश्वास आहे. याच अंध विश्वासापायी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. तंत्र-मंत्राच्या जादूने पुन्हा जिवंत होण्यासाठी, एका व्यक्तीने स्वत:चीच हत्या करवून घेतली आहे. उत्तर प्रदेशातल्या गंगा-यमुना-सरस्वतीच्या संगमावरच्या प्रयागराज शहरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणाचा असा विश्वास होता, की देवी त्याला पुन्हा जिवंत देईल आणि त्याला अधिक सामर्थ्यवान बनवेल. हे प्रकरण समोर आल्यानंतर तरुणाचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
10 डिसेंबर रोजी कारछना पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गाढीगाव परिसरात महामार्गाच्या कडेला 37 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाचं डोकं धडापासून वेगळं केलेलं होतं. मृतदेह मिळाल्याची माहिती गावात आगीसारखी पसरली. पोलिसांनी आपल्या खबऱ्यांच्या साह्याने या प्रकरणाचा गुंता सोडवला आहे. खुनाच्या घटनेमागची सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर पोलीसही चक्रावले आहेत. पोलीस पथकाने आरोपी नितीश सैनी याला हरिद्वारमधून अटक केली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…