ताज्याघडामोडी

प्रेमिकेला भेटू दिले नाही, माथेफिरुने शाळेच्या मुख्याध्यापकासोबत केलं भयानक कांड

छत्तीसगड राज्यातल्या बिलासपूरमध्ये एकापाठोपाठ एक गुन्हे घडताहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस नेत्याच्या हत्येबाबत अजून धागेदोरे मिळाले नसले, तरी तोपर्यंत आणखी एक हत्या झाली आहे. या गुन्ह्यातल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शाळकरी मुलीवर प्रेम करणाऱ्या एका प्रेमवीराने तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकांची हत्या केली. पोलिसांनी लगेचच त्यामागच्या सूत्रधाराला शोधून त्याला अटकही केली.

प्रेमासाठी वाट्टेल ते करणारे काही वेळा एखाद्याचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. अशीच एक घटना छत्तीसगड राज्यातल्या बिलासपूरमधल्या तारबहार भागात घडली. प्रेमिकेला भेटू न दिल्यामुळे माथेफिरू इसमाने तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा जीव घेतला. सरकारी शाळेचे मुख्याध्यापक असलेले प्रदीप श्रीवास्तव (52) ऊर्फ दीपक लिंक रोडच्या देवेंदर गल्लीमध्ये राहत होते. पचपेडीच्या सरकारी शाळेत ते मुख्याध्यापक होते. रात्री घराचा दरवाजा उघडल्याची चाहूल लागल्याने त्यांची पत्नी अनिताने बाहेर येऊन पाहिलं, तर प्रदीप श्रीवास्तव रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते. डोक्यातून भरपूर रक्तस्राव झाला होता. ते दृष्य पाहून पत्नीने आरडाओरडा केला व शेजाऱ्यांकडे मदतीची मागणी केली. शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. दरम्यान, मुख्याध्यापक प्रदीप श्रीवास्तव यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

पोलिसांनी या घटनेची तत्काळ चौकशी सुरु केली. मुख्याध्यापकांच्या घराच्या कॉलनीमध्ये तपास केला असता एक तरुण फिरताना आढळला. त्याने स्वतःचं नाव उपेंद्र कौशिक असं सांगितलं. सिरगिट्टी ठाणे भागातल्या हरदीकला इथला रहिवासी असल्याचं त्याने सांगितलं. पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने मुख्याध्यापक प्रदीप श्रीवास्तव यांची हत्या केल्याचं कबूल केलं. गर्लफ्रेंडला मुख्याध्यापक त्रास देत होते, म्हणून त्यांना मारल्याचं त्यानं सांगितलं. मुख्याध्यापक त्याला त्याच्या गर्लफ्रेंडला भेटू देत नसत. तसंच शाळेच्या जवळपासही फिरण्यास त्याला मनाई करण्यात आली होती. त्यामुळे त्या इसमाने मुख्याध्यापकांची हत्या केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

यशवंतराव चव्हाण (यमाई) तलावात पाणी सोडण्यास सुरुवात

नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले…

2 days ago

स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिर : प्रणव परिचारक

11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘प्रोटोटाईप/प्रोसेस डिझाईन अँड डेव्हलपमेंट’ विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न.

पंढरपूर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…

2 days ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथे विद्युत अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…

3 days ago

भाजी मंडईतील विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेत नगराध्यक्षा डॉ.प्राणिताताई भालकेयांची प्रत्यक्ष पाहणी.

पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.…

4 days ago

शासनांच्या विविध योजना व्याज परतावा योजनांचा लाभ घ्यावा – सौ सुनेत्रताई पवार

रुक्मिणी सहकारी बँकेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न पंढरपूर येथील रुक्मिणी सहकारी बँकेची ३१…

4 days ago