तामिळनाडून एका 19 वर्षीय महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला त्रिची सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, तिच्यावर उपचार सुरू असताना तिची प्रकृती खालावली आणि तिने कबुलीजबाब देण्याचा निर्णय घेतला. त्याआधारे जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन महिलेकडून जबाब नोंदविला. यानंतर रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाला. महिलेने विवाहपूर्व एका बाळाला जन्म दिला होता. यामुळे तिच्या वडिलांनी आणि मावशीने तिला जबरदस्तीने विष पाजले. तिच्या बाळाला झुडुपात फेकून दिले. त्याला वाचविण्यात पोलिसांना यश आले.
महिलेचे म्हणणे आणि तपासाच्या आधारे काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्रिची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्कोम्बू येथे सापडलेले मूल हे मृत महिलेचेच मूल असल्याचे समोर आले आहे. अविवाहित महिलेने मुलाला जन्म दिला. पालकांनी, हे कुटुंबासाठी लाजिरवाणे कृत्य समजून ते लपविण्यासाठी मुलीच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी सांगितले की, मूल जन्माला आले तेव्हा त्यांना वाढवायचे. नव्हते म्हणून त्यांनी ते झुडपाजवळ फेकले.
कुटुंबीयांनी मुलाच्या आईची म्हणजेच १९ वर्षीय महिलेची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, विषबाधा झालेल्या अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला. मात्र तिच्या मृत्यूपूर्व कबुलीमुळे सत्य बाहेर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. महिलेचे वडील आणि मावशीला अटक करण्यात आली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…