ताज्याघडामोडी

केंद्रीय रस्ते विकास निधीतून मंगळवेढ्यासाठी १७ कोटी मंजूर – आ. समाधान आवताडे

मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते विकास व पायाभूत सोयीसुविधामधून १७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत अशी माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
हुलजंती ते नंदेश्वर या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी ८ कोटी रुपये तर जित्ती ते मरवडे या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी ९ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. आ. आवताडे यांच्या अथक प्रयत्नांतून यापूर्वीही राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील विविध रस्ते सुधारणा आणि बांधणीसाठी भरघोस निधी प्राप्त झाला आहे. मतदारसंघाच्या धोरणात्मक प्रगतीसाठी आणि पायाभूत विकासासाठी केंद्रस्थानी असणाऱ्या रस्ते विकासासाठी आ. आवताडे हे नेहमीच प्रयत्नशील असतात. आ. आवताडे यांच्या रस्ते विकास अनुषंगाने विकासाभिमुख दूरदृष्टीतील कार्यात्मक भूमिकेमुळे सध्या वाहतुकीला येत असलेले अडथळे दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा समतोल विकास व्हावा यासाठी आ. आवताडे यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता आ. आवताडे यांच्या या मागणीवरून रस्ते विकास निधीतून सदर निधी मंजूर झाला आहे.
पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा समतोल आणि व्यापक पद्धतीने विकास व्हावा याकडे आपले वैयक्तिक लक्ष असून यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार आहे. मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला तो मी माझ्या कामातून सार्थ ठरविणार आहे. येत्या काळात केंद्र व राज्य शासनामार्फत उर्वरित रस्ते कामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा सुरूच राहणार आहे. आ. आवताडे यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्री ना. नितीन गडकरी यांच्यामुळे केंद्राकडून एवढा भरीव आणि मोठ्याप्रमाणातील निधी पहिल्यांदाच मंगळवेढा तालुक्यातील विकास कामांना मिळाल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

3 weeks ago