नागपूरात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. संपूर्ण चेहऱ्याला लिपस्टिक लावून विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सानिका प्रवीण लाजूरकर, असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नीट परीक्षेची तयारी करत होती.
घटना बेलतरोडी पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पृथ्वीराजनगरातील शिव हाइट्स येथील पाचव्या माळ्यावर उघडकीस आली. सानिकाचे वडील प्रवीण हे वर्धा येथील कंपनीत व्यवस्थापक असून, आईही वर्धेतीलच महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. सानिका ही फ्लॅटमध्ये राहायची. गेल्या काही दिवसांपासून सानिका तणावात होती. सोमवारी मध्यरात्री ती आई-वडिलांसोबत बोलली. त्यानंतर तिने चेहऱ्यावर लिपस्टिक लावली आणि पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला.
सकाळी ती शिकवणी वर्गाला गेली नसल्यामुळं तिच्या शिक्षकांनी तिच्या पालकांना सांगितले. त्यांनी सानिकासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळं तिचे आई-वडिल तातडीने नागपुरात आले. त्यावेळेस सानिकाच्या घराचा दरवाजा बंद होता. अनेकवेळा आवाज देऊनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर प्रवीण यांनी दरवाजा तोडला तेव्हा सानिकाने आत्महत्या केल्याचे उघड झाले.
एका नागरिकाने बेलतरोडी पोलिसांना याबाबत माहिती दिली. चनामा करून पोलिसांनी सानिकाचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी सानिकाने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. ‘मी त्रस्त आहे, आत्महत्या करीत आहे’, असे तिने इंग्रजीमध्ये चिठ्ठीत लिहिले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…