राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. तसेच अनैतिक संबंधातून हत्येच्याही घटना वाढत आहेत. यातच आता यवतमाळ जिल्ह्यातून एक घटना समोर आली आहे. यवतमाळ येथील जिल्हा न्यायालयातील आठ क्रमांकाच्या न्यायालयात एका महिलेने प्रियकरावर कटरने हल्ला केला. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली.
हा प्रकार घडला तेव्हा कोर्टाचे अधिकारी तेथे उपस्थित असल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांनी शहर पोलिसांना पाचारण करून हल्ला करणाऱ्या महिलेला त्यांच्या ताब्यात दिले. दरम्यान, हल्ल्याची वार्ता पसरताच त्या परिसरात गर्दी जमा झाली होती.
विशाल मारोतराव शिंदे (वय ४५) रा. शिंदे नगर यवतमाळ अशी जखमीचं नाव आहे. हल्ला करणाऱ्या महिलेचे विशालसोबत प्रेम संबंध होते. दरम्यान, त्यांचे संबंध महिलेच्या पतीला माहीत झाले. त्यामुळे महिला विरोधात पतीने घटस्फोटाचा खटला दाखल केला. तर दुसरीकडे विशाल सोबतही महिलेचा वाद झाला. यातून या दोघांनी परस्पर विरोधात तक्रारी दाखल केल्या. या प्रकरणात आठ क्रमांकाच्या न्यायालयात सुनावणी होती. न्यायालयासमोर उभे असताना महिला अचानक संतप्त झाली आणि तिने स्वतःजवळ असलेल्या कटरने विशाल शेंडे याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.
हा वार विशालच्या गालावर लागला. तेथे उपस्थित कोर्ट पैरवी रमेश उघडे यांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोर महिलेला ताब्यात घेतले. तेथे महिला पोलीस कर्मचारी पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर तिथे बघ्यांची एकच गर्दी झाली. घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली आणि पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. तर जखमी विशाल याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. शहर पोलिसांनी महिला व तिच्या पतीविरोधात प्राप्त तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…