ताज्याघडामोडी

प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला पाठवले अश्लील फोटो, लाखो रुपये उकळले; नाशिकमधील धक्कादायक घटना

नाशिक शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकराच्या मदतीने पत्नीने आपल्याच पतीला ब्लॅकमेल करत साडे चार लाख रुपये उकळल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीने प्रियकराशी संगनमत करत स्वतःचे नग्न अवस्थेतील फोटो पतीला पाठवत ब्लॅकमेल केल्याचा प्रकार नाशकात घडला. या प्रकरणी पत्नी आणि प्रियकर यांच्या विरोधात नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पतीने दिलेल्या फिर्यादीवरून एक अनोळखी मोबाईल क्रमांकावरून त्यांना फोन आला, “तुझ्या पत्नीचे लग्नानंतरही दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत. त्या दोघांचे खासगी फोटो आणि काही खासगीतील व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आहेत.” असे सांगून संशयिताने पत्नीचे नग्न अवस्थेतील फोटो मोबाईलवर पाठवले आणि हे प्रकरण मिटवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील असे म्हणत पैशाची मागणी केली.

तक्रारदार पतीने बदनामीच्या भीतीने ४ लाख ५० हजार रुपये दिले. दरम्यान, ब्लॅकमेल करण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ पाठवलेला नंबर कुठला आहे. याबाबत अंबड पोलिसांकडून तपास सुरू आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचून दोघांचे अश्लील फोटो मोबाईलवर पाठवले. पतीने समाजात बदनामी होईल.

या भीतीने ४ लाख ५० हजार रुपये दिले. पत्नी मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप तक्रारदार पतीने तक्रारीत केला आहे. तक्रारदाराने न्यायालयात पत्नी व प्रियकराच्या विरोधात तक्रार दिली होती. न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने पत्नी व प्रियकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

3 weeks ago