मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उल्हासनगरमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या कामाची पाहणी करताना वाद होऊन हा हाणामारीचा प्रकार घडला. भररस्त्यात झालेल्या या राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून एसएसटी कॉलेज परिसरातील रस्त्याचं काम मंजूर झालं होतं. या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी स्वतः खासदार श्रीकांत शिंदे येणार असल्यानं शिंदे गटाचे पदाधिकारी अरुण आशान आणि विजय जोशी हे कार्यकर्त्यांसह तिथे गेले होते. यावेळी या परिसरातील केडीएमसीच्या माजी नगरसेविका विमल वसंत भोईर यांच्या मुलांनी काही साथीदारांसह विजय जोशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात जोशी यांच्या एका कार्यकर्त्याच्या डोक्यात दुखापत झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच स्वतः विजय जोशी यांनाही यावेळी मारहाण करण्यात आली.
दरम्यान, या सगळ्या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. यानंतर विजय जोशी यांनी तक्रार करण्यासाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र या सगळ्या प्रकारानंतर आपल्याच गटातल्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानं विजय जोशी यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…