डिजिटलायझेशनच्या काळात बहुतेक लोक रोख रकमेऐवजी यूपीआयद्वारे पैसे देणे पसंत करतात. तुम्ही देखील जर यूपीआयद्वारे पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. बँका तुमच्यावर व्यवहार मर्यादा ठेवते हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही यूपीआय ॲपद्वारे फक्त एका मर्यादेपर्यंत पेमेंट करू शकता. यूपीआय व्यवहारांसाठी प्रत्येक बँकेची दैनंदिन मर्यादा असते. म्हणजेच जर तुम्ही एका दिवसात ठराविक रकमेपर्यंतच पैसे पाठवू किंवा मिळवू शकता. याशिवाय, यूपीआयद्वारे एकाच वेळी किती पैसे काढता येतील याच्या देखील वेगवेगळ्या बँकांच्या मर्यादा असतात.
एनपीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एखादी व्यक्ती यूपीआयद्वारे एका दिवसात १ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकते. ही मर्यादा बँकेनुसार वेगवेगळी असू शकते. कॅनरा बँकेत दैनंदिन मर्यादा फक्त २५ हजार रुपये आहे तर भारतीय स्टेट बँकेत (एसबीआय) दैनंदिन मर्यादा १ लाख रुपये आहे.
मनी ट्रान्सफर मर्यादेसोबतच एका दिवसात किती यूपीआय ट्रान्सफर करता येते यावरही मर्यादा आहे. दैनिक यूपीआय हस्तांतरण मर्यादा २० व्यवहारांवर सेट करण्यात आली असून मर्यादा संपल्यानंतर मर्यादेचे नूतनीकरण करण्यासाठी २४ तास प्रतीक्षा करावी लागेल. मात्र, ही मर्यादा देखील बँकेनुसार भिन्न असू शकते. अशा परिस्थितीत गूगल पे, फोनपे आणि इतर यूपीआय पेमेंट सेवा प्रदात्यांच्या दैनंदिन हस्तांतरण मर्यादांवर एक नजर टाकूया.
GPay यूपीआय ट्रान्सफर मर्यादा
गूगल पे सर्व यूपीआय ॲप्स आणि बँक खात्यांत एकूण १० व्यवहार मर्यादांसह दररोज १ लाख रुपयांपर्यंतचे दैनंदिन मनी ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. विशेष म्हणजे, जर कोणी २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विनंत्या पाठवल्या तर गूगल पे दैनंदिन व्यवहार मर्यादा देखील थांबवते.
फोनपे मर्यादा
‘फोनपे’ने दैनंदिन यूपीआय व्यवहाराची मर्यादा रु १ लाख रुपयांवर सेट केली आहे. पण ही मर्यादा बँकेनुसार वेगवेगळी असू शकते. त्यासोबतच, बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एखादी व्यक्ती फोनपेद्वारे दररोज जास्तीत जास्त १० किंवा २० व्यवहार करू शकते. तसचे गूगल पे प्रमाणेच फोनपे देखील दररोज २ हजार रुपयांपर्यंतच्या पैशाच्या विनंतीस अनुमती देते.
पेटीएम यूपीआय हस्तांतरण मर्यादा
पेटीएमद्वारे यूपीआय वापरकर्ते १ लाख रुपयांपर्यंत मनी ट्रान्सफर करू शकतात.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…