ताज्याघडामोडी

खळबळजनक! आई-वडिलांनी मोबाईल घेण्यास पैसे दिले नाही, तरुणाने केली आत्महत्या

नवीन माेबाईल खरेदी करण्यासाठी वडील पैसे देत नसल्याने 23 वर्षीय तरुणाने साेसायटीच्या चाैथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सातपूर परिसरातील श्रमिक नगरात मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

चाैथ्या मजल्यावरून उडी मारली : अक्षय अरुण खेताडे (वय-23, रा. इस्पाईट हाईट्स, श्रमिक नगर, सातपूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय हा सध्या बेराेजगार हाेता. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याचा माेबाईल हरविला हाेता. त्यामुळे ताे आई-वडिलांकडे नवीन माेबाईल घेण्यासाठी वारंवार पैशांचा तगादा लावत हाेता. मात्र मद्याची नशा करत असल्याने त्याच्या आईने त्याला माेबाईल खरेदीसाठी पैसे दिले नाही. त्यामुळे ताे नैराश्यात हाेता.

अतिरक्तस्रावाने मृत्यू : शुक्रवारी रात्री एक ते दीड वाजता अक्षयने साेसायटीतील घराच्या दरवाज्याची कडी बाहेरुन लावून घेतली. त्यानंतर ताे चाैथ्या मजल्यावर गेला व त्याने तेथून उडी मारुन घेतली. ही घटना लक्षात येताच त्याला कुटुंबाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाेक्याला गंभीर दुखापत व अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत सातपूर पाेलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास केला जात आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 hour ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago