अनेकदा आपल्याला जेवणाच्या ताटामध्ये केस दिसतो. खरं तर हे कोणालाच आवडत नाही. मात्र, एका व्यक्तीने जेवणात केस सापडल्याने आपल्या पत्नीसोबत असं काही केलं जे वाचून तुमच्या अंगावर काटा येईल. ही घटना उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधील आहे. यात पतीने छोट्या गोष्टीसाठी आपल्या पत्नीसोबत अतिशय धक्कादायक कृत्य केलं.
पीडितेचं म्हणणं आहे, की तिचा पती जेवण करत होता. तेव्हा जेवणात केस निघाला. हे पाहून महिलेचा पती चांगलाच भडकला. महिलेनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, तिच्या पतीने तिला शिवीगाळ केली. तिचे हातपाय बांधून जबरदस्ती संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर याचा विरोध केल्याने तिचे केसच काढून टाकत टक्कल केली.
महिलेचा आरोप आहे की, तिचा पती तिच्यासोबत हे सगळं करत असताना तिच्या सासूने आणि दिराने तिथेच उभे राहून हे सगळं फक्त बघत राहाण्याचं काम केलं. इतकंच नाही तर ते महिलेच्या पतीला आणखी भडकवत राहिले. महिलेचं म्हणणं आहे की, तिने फोन करून माहेरकडच्या लोकांना या घटनेची माहिती दिली. मात्र, माहेरकडचे लोक घरी पोहोचताच पतीने त्यांनीाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
महिलेचा असाही आरोप आहे की, तिचा पती हुंड्याची मागणीही करतो आणि तिला मारहाणही करतो. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी पती, सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. महिला आपल्या माहेरी गेली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…