ढाबा चालकास भावासह अटक
ढाबा चालक ओंकार केंद्रे (वय २१ वर्ष) व त्याचा लहान भाऊ कैलास केंद्रे (वय १९ वर्ष) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे चाकण रोडवर एक धाबा आहे. या ढाब्यावर आचारी म्हणून एक परप्रांतीय कामगार आणला होता. प्रोसेंजीत गोराई असे कामगाराचे नाव होते.
जेवणात मीठ जास्त झाले म्हणून ढाबा मालक ओंकार केंद्रे आणि त्याचा लहान भाऊ कैलास केंद्रे यांनी २६ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री आचाऱ्याच्या डोळ्यांमध्ये मिरची पावडर टाकली. त्यानंतर लाकडी दांडके, लोखंडी रोड व वायरने मारहाण करून जीवे ठार मारून टाकले.
खून केल्यानंतर त्याचा मृतदेह दोघांनी खोलीतच लपवून ठेवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे त्या मृतदेहाची डोंगराळ भागात नेऊन विल्हेवाट लावली.
याबाबत पोलिसांना माहिती समजल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत काही संशयित गोष्टी पोलिसांना आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी वेषांतर करून या ढाब्यावर जाऊन या घटनेसंदर्भात माहिती घेतली. त्यानुसार ढाबा मालक आणि त्याच्या भावाला संशयित म्हणून ताब्यात घेतले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…