माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोप प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) प्राथमिक चौकशी सुरू केली असल्याची माहिती गुरुवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली. ठाकरे कुटुंबीयांविरोधात सीबीआय व ईडीमार्फत तपास करण्याचा आदेश द्यावा, अशा विनंतीच्या गौरी भिडे यांनी फौजदारी जनहित याचिका केली आहे. ‘ही याचिका केवळ गृहितकांवर आधारित आहे. शिवाय याचिकाकर्त्यांनी अन्य कायदेशीर मार्गांचाही अवलंब केलेला नाही. ठाकरे आता सत्तेत नसल्याने चौकशीवर प्रभाव टाकला जाण्याचा आरोपही होऊ शकत नाही’, असा युक्तिवाद मांडून ही याचिका सुनावणीयोग्यच नसल्याचा आक्षेप ठाकरेंच्या वकिलांनी नोंदवला. त्यानंतर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला. मात्र, दुपारच्या सत्रात मुख्य सरकारी वकील अरुणा पै यांनी या विषयाचा खंडपीठासमोर पुन्हा उल्लेख करून ‘ईओडब्ल्यू’ने प्राथमिक चौकशी सुरू केली असल्याची माहिती दिली आणि ती आदेशात नोंदवण्याची विनंती केली. त्याला ठाकरेंतर्फे ज्येष्ठ वकील अॅस्पी चिनॉय यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि हा कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग असल्याचा आरोप केला.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…