पुणे हवामान विभागाने नुकताच एक अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. राज्यात कधीही 15 डिसेंबर पर्यन्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
त्यामुळे ऐन हिवाळ्यात पाऊस पडणार असल्याचे चित्र निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसाठी हे धोकेदायक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नुकसानीला तोंड देण्याची वेळ येते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बेमोसमी पाऊसाने आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता ऐन हिवाळ्यात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस तर काही ठिकाणी तुरळक जोरदार पाऊसही पडण्याची शक्यता आहे. मॅनदौस या चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रात 15 डिसेंबरपर्यन्त कधीही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुणे हवामान विभागाने पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. ऐन हिवाळ्यात आणि त्यातच कडाक्याची थंडी पडलेली असतांना हा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.
यंदाच्या वर्षी बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, शेतमाल हातातून गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा असेच संकट आले तर शेतकरी पुरता हवालदिल होणार आहे.मॅनदौस या चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पावसाची शक्यता, वर्तविण्यात आल्याने महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…