ताज्याघडामोडी

प्रेमसंबंध तोडल्याने प्रेयसीचे विवस्त्रावस्थेतील छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित

प्रेमसंबंध तोडल्यानंतर प्रियकराकडून दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे पोलिसांकडे तक्रार दिल्याने प्रियकराने प्रेयसीचे विवस्त्रावस्थेतील छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित केल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी शिरुरमधील एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी देवेंद्र धरमचंद फुलफगर (रा. शिरुर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी आणि फुलफगर यांच्यात प्रेमसंबध होते. त्यांच्यात वाद झाल्याने तरुणीने फुलफगरशी असलेले प्रेमसंबंध तोडले. त्यानंतर आरोपीने तरुणीला त्रास दिल्याने तिने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

त्यानंतर फुलफगर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फुलफगर गुन्हा मागे घेण्यासाठी तरुणीवर दबाब आणत होता. गुन्हा मागे न घेतल्याने त्याने प्रेयसीचे विवस्त्रावस्थेतील छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित केले. हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago