पाठीमागून जात शिक्षकाने केला विनयभंग
अमरावती जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. अशातच एका शिक्षकाने विद्यार्थिनीला स्टोअर रूममध्ये टाचणी आणण्यासाठी पाठवले आणि एकांताचा फायदा घेत त्या मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या शिक्षकाला न्यायालयासमोर हजर केल्याची माहिती समोर आली आहे. तेरा वर्षीय विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपामुळे एका शिक्षकाविरुध्द सोमवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षकाला जिल्हा परिषद सीईओंच्या आदेशाने निलंबित करण्यात आले.
प्रशांत चक्रधर सोनार (४२) असे निलंबित झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. धारणी तालुक्यातील एका शाळेत शिक्षक असलेल्या सोनार यांनी सोमवारी सकाळी एका १३ वर्षीय विद्यार्थिनीला टाचणी आणण्यासाठी पाठवले. शिक्षकांनी सांगितल्यामुळे विद्यार्थिनी टाचणी आणायला गेली असता शिक्षक सोनार विद्यार्थिनीच्या मागे गेला. त्याने आपल्यासोबत असभ्य वर्तन केले, अशी तक्रार पीडित विद्यार्थिनीने धारणी पोलिसांत दिली. या वरून पोलिसांनी शिक्षकाविरुध्द तात्काळ विनयभंग तसेच पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…