ताज्याघडामोडी

न्यायालयाच्या गेटवरच तरुणीने गळफास घेऊन संपवलं आयुष्य

साखरपुड्यानंतर नवरदेवाने दिला होता लग्नास नकार

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या गेटवरच एका तरुणीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. मंगळवारी सकाळच्या वेळेस ही घटना उघडकीस आल्याने सदर परिसरात एकच खळबळ माजली. 

पौर्णिमा मिलिंद लाडे ( 27 ) असं मृतक तरुणीचं नाव असून, ती गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव (चोप) गावची मूळ निवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, सदर घटनेची माहिती माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपासाची सूत्र हाती घेतली. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार ज्याच्याशी लग्न ठरलं त्याच नवरदेवानं साखरपुडा झाल्यावर लग्नास नकार दिल्याने तिनं हे टोकाचं पाऊल उचललं. 

ब्रह्मपुरी शहरात न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम अद्यापही सुरूच आहे. अशातच न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरत मुलीने आयुष्य संपवल्यानं शहरात चर्चांना पेव फुटले आहेत. अद्यापही सदर प्रकरणी कोणावरही कारवाई करण्यात आली नसली, तरीही या प्रकरणात नेमकं दोषी कोण हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago